मुंबई : गेले दोन दिवस मुंबई, ठाणे, नवी मुंबईला झोडपणाऱ्या पावसाने गुरुवारी काहीशी उसंत घेतली होती. मात्र रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी अतिमुसळधार, तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार मुंबई शहर तसेच उपनगरांत शुक्रवारी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील चार तास मुंबईसह ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

हेही वाचा – मुंबईकरांच्या धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षाच्या तुलनेत निम्मा साठा

हेही वाचा – मुंबई : रेल्वे रूळ ओलांडल्यास दंडात्मक कारवाई, समांतर रस्ता फाटकाजवळ आरपीएफ, तिकीट तपासनीस तैनात असणार

राज्यातील अनेक भागांत गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर काहीसा कमी होता. दरम्यान, शुक्रवारी घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर तसेच साकीनाका परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. असल्फा मेट्रो स्थानकाबाहेर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईत सोमवारपासून पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.