मुंबई : मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात पुढील एक तासात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० – ४० किमी असेल.

मुंबई, ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार काही भागात सायंकाळी ४ नंतर पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये बदलापूर, मुलुंड, नवी मुंबई परिसराचा समावेश आहे. याचबरोबर पुढील एक तासात मुंबईसह ठाण्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुढील तीन ते चार तास मुंबईत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा – मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४१४ पैकी ३०५ झाडांची छाटणी पूर्ण

हेही वाचा – मुंबई : वडाळा ‘आरटीओ’च्या तिजोरीत ४८३ कोटी

नवी मुंबई आणि ठाणे परिसरात प्रामुख्याने मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader