महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने आता अनिल देशमुख यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझेच्या बद्दल क्रॉस एक्झामिनेशनसाठी वकिलाच्या अनुपस्थितीमुळे हा दंड ठोठवला गेला आहे. हा दंड मुख्यमंत्री मदत निधीत जमा केला जाणार आहे.

या अगोदर सप्टेंबर महिन्यात वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. परमबीर सिंग हे आयोगासमोर उपस्थित राहत नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर आयोगाने परमबीर सिंग यांना ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये या आयोगाची स्थापना केलेली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandiwal commission imposes a fine of rs 50000 on former maharashtra home minister anil deshmukh msr