मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात समन्वयक मंत्री म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची फेरनिवड करण्यात आली आहे.राज्य सरकाने या बाबत शुक्रवारी शासन निर्णय काढून फेरनिवड केली आहे. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी नेमलेले वकील आणि सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये समन्वय साधणे. सीमा भागातील मराठी जनतेच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मंत्री पाटील आणि देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे.

सीमा प्रश्न आहे तरी काय

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर आदी भागांवरून सीमावाद आहे. वरील भागात मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून सीमा भागातील जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. या लढ्याचे नेतृत्व महाराष्ट्र एकीकरण समिती करीत आहे. पण, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर समिती आणि लढा कमकुवत झाला आहे. महाराष्ट्र सरकारने या बाबत सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर सीमा प्रश्नांवर कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.