राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध मुद्यांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून शिंदे सरकारला लक्ष केलं. दरम्यान, अजित पवारांच्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्त्युतर दिले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने विरोधकांना अतिशय वाईट वागणूक दिली, असा आरोपही त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “ठाण्यातील राडा मुख्यमंत्र्यांवर लांछन”; अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “माझ्या विरोधात…”

“महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ज्या लोकांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती, अशा शेकडो लोकांची यादी माझ्याकडे आहे. महाविकास आघाडी सरकारने विरोधकांना अतिशय वाईट वागणूक दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही ते आकसाने वागले. त्यांनी आधी फडणवीसांची सुरक्षा कमी केली. त्यानंतर गार्ड कमी केले. त्यांचा ताफाही कमी केला. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांनी सुरक्षा देऊ केली, ती सुद्धा तत्कालीन राज्यसरकारने नाकारली होती. त्यामुळे अजित पवारांनी याविषयावर बोलू नये”, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले.

“राज्यात सध्या अतिशय संवेदनशील गृहमंत्री आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे. आता राज्यात घटना घडताच तातडीने कारवाई होते. महाविकास आघाडीच्या काळात पुरावे असतानाही कारवाई होत नव्हती. जितेंद्र आव्हाडांनी आनंद खरमुसेला बंगल्यावर नेऊन मारले होते. तेव्हा गृहमंत्री वळसे पाटील कुठं होते? अशी अनेक उदाहरणे आहेत. राज्यात तीन महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यामध्ये तातडीने कारवाई होते आहे. त्यामुळे सत्ता गेल्याने अजित पवार अस्वस्थ आहे. त्यामुळे ते असा प्रकारे टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून केवळ आरोप करण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “तर ती महिला माझ्या अंगावर पडली असती, अन्…,” जामीन मिळताच आव्हाडांचा गंभीर आरोप, म्हणाले “सगळं ठरलं होतं”

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवरून अजित पवारांवी शिंदे सरकारला लक्ष केले होते. “मी अधिवेशनात प्रश्न विचारला आहे. माहिती अधिकारात माहितीही मागवली आहे. किती लोकांना वाय प्लस दर्जा आहे. त्याची खरंच त्यांना गरज आहे का? काही काहींचा ताफा तर बघायलाच नको. मी स्वत: उपमुख्यमंत्री होतो. पण मी जर जास्त गाड्या असल्या, तर सांगतो ‘गाड्या कमी करा. काही अधिकाऱ्यांनी त्या कामात यायचं कारण नाही’. आज २०-२५-३० गाड्यांचा सरकारचा ताफा असतो. अरे हा पैसा काय तुमचा नाहीये. सरकारचा पैसा आहे. टॅक्स स्वरुपात आलेला पैसा आहे”, असे ते म्हणाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule replied to ajit pawar criticism on security issue spb