कोकण रेल्वे महामंडळाचे पावसाळी वेळापत्रक जाहीर झाले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये कोकणात जाणाऱ्या गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कोकणात पावसामुळे अनेकदा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे महामंडळाने आपल्या गाडय़ांच्या वेळा एक ते अर्धा तास अगोदर केल्या असल्याचे कोकण रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या काही गाडय़ांच्या नव्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत. मडगाव-सीएसटी मांडवी एक्स्प्रेस (स. ८.३०), सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेस (सायं. ५.३०), एर्नाकुलम-निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस (स. १०.४५), जनशताब्दी एक्स्प्रेस (दु. १२.१०), मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस (दु. १२.५०), मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्स्प्रेस (दु. ४.४५), मडगाव-हापा एक्स्प्रेस (स. ७.१५) आणि मडगाव-एर्नाकुलम एक्स्प्रेस (रा. ९.००)

Story img Loader