मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने बसेसच्या मार्गात बदल केले आहेत. श्रेयस जंक्शन येथे मंडप बांधल्यामुळे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ महाकाली गुंफा ते विक्रोळी आगारापर्यंत धावणारी (बस मार्ग क्रमांक ४१०) बस अमृतनगरकडे न जाता, थेट विक्रोळी आगाराकडे जाईल. रावळपाडा बस थांब्यावर मंडप बांधल्यामुळे दहिसर पूर्वेकडील रावळपाडा ते बोरिवली रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या (बस मार्ग क्रमांक २९८) बसचे प्रवर्तन डोंगरेवाडी येथे खंडित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्नमवार नगर येथे मंडप बांधल्यामुळे कन्नमवार नगर ते विक्रोळी रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या (बस मार्ग क्रमांक ३९७) बसचे रामचंद्र शिरोडकर मार्गाने परावर्तित केले आहे. तसेच मानखुर्द येथेही मंडप बांधल्यामुळे मानखुर्द स्थानक ते ट्रॉम्बे (बस मार्ग क्रमांक ३७८) बस मार्ग महानगरपालिका शाळा येथे खंडित केला आहे.