लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकादरम्यान उड्डाणपुलाचे गर्डर उभारण्यासाठी ६ ते ११ एप्रिलदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या काळातील अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची सेवा मध्येच खडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या घाटकोपर-कांजूरमार्ग दरम्यान अप-डाऊन धिम्या, अप-डाऊन जलद आणि ५ व्या व ६व्या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवारी रात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.०५ वाजेपर्यंत २.४५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

या रेल्वेगाड्या शॉर्ट टर्मिनेट

  • भुवनेश्वर- सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे येथे समाप्त केली जाईल.
  • हावडा- सीएसएमटी एक्स्प्रेस दादर येथे समाप्त केली जाईल.
  • विशाखापट्टणम- एलटीटी एक्स्प्रेस ठाणे येथे १५ मिनिटे थांबवण्यात येईल.
  • मंगळुरु- सीएसएमटी एक्सप्रेस निळजे येथे ५० मिनिटे थांबवण्यात येईल.

या दोन लोकलच्या वेळेत बदल

  • रात्रीच्या वेळी सीएसएमटी-कुर्ला लोकल रात्री ११.५७ वाजता धावेल.
  • कुर्ला-ठाणे लोकल पहाटे ४ वाजता सुटेल.

गोरखपूर – एलटीटी एक्स्प्रेस, हैदराबाद – सीएसएमटी एक्स्प्रेस, गदग – सीएसएमटी एक्स्प्रेस, आदिलाबाद- सीएसएमटी एक्स्प्रेस आणि शालिमार – एलटीटी एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटांनी विलंबाने पोहचतील.

आणखी वाचा- पालघर, ठाण्यामध्ये सोमवार, मंगळवारी हलक्या सरींची शक्यता

ब्लॉक : रविवारी रात्री १.२० ते सोमवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत

ब्लॉक विभाग : अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि कांजूरमार्ग व घाटकोपर दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर

  • सीएसएमटी-कुर्ला लोकल रात्री ११.५७ वाजता धावेल.
  • ठाणे-कुर्ला लोकल पहाटे ४.०० वाजता सुटेल.
  • ठाणे ते सीएसएमटी पहाटे ५.१६ वाजता सुटेल.

या लोकल रद्द

  • पहाटे ४.१६ वाजताची ठाणे-सीएसएमटी लोकल
  • पहाटे ४.४० वाजताची ठाणे-सीएसएमटी लोकल