मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ आणि वढू येथील विकास आराखडय़ास नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. या विकास आराखडय़ाच्या नावामध्ये अंशत: बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केले. यानुसार या विकास आराखडय़ाच्या नावात अंशत: बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ, मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधिस्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि. पुणे विकास आराखडा’ असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Mar 2023 रोजी प्रकाशित
संभाजी महाराज बलिदानस्थळाच्या नावात बदल
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ आणि वढू येथील विकास आराखडय़ास नियोजन विभागाने मान्यता दिली आहे.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई

First published on: 03-03-2023 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change name of sambhaji maharaj sacrifice place increase development to the plan ysh