मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ आणि वढू येथील विकास आराखडय़ास नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. या विकास आराखडय़ाच्या नावामध्ये अंशत: बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केले. यानुसार या विकास आराखडय़ाच्या नावात अंशत: बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ, मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधिस्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि. पुणे विकास आराखडा’ असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2023 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change name of sambhaji maharaj sacrifice place increase development to the plan ysh