मुंबई : मध्य रेल्वेवरील साईनगर शिर्डी – तिरुपती, एलटीटी- नांदेड एक्स्प्रेसच्या संरचनेत बदल करण्यात आला असून अमरावती – तिरुपती एक्स्प्रेसच्या संरचनेत लवकरात बदल करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. गाडी क्रमांक १७४१८ साईनगर शिर्डी – तिरुपती एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १७४१७ तिरुपती – साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या संरचनेत अनुक्रमे २२ आणि २१ मार्चपासून बदल करण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी, दोन गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक पॅन्ट्रीकार जोडण्यात आली आहे. तसेच २७ मार्चपासून गाडी क्रमांक १२७६६ अमरावती – तिरुपती एक्स्प्रेस आणि २५ मार्चपासून गाडी क्रमांक १२७६५ तिरुपती – अमरावती एक्स्प्रेसमधील संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
या गाडीत एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील. तसेच २१ मार्चपासून गाडी क्रमांक ०७४२७ लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस आणि २० मार्चपासून गाडी क्रमांक ०७४२६ हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रसमधील संरचनेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७४२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ०७४२८ हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये संरचनेत बदल होणार असून या गाडीत १२ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, एक पँट्री कार आणि २ जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन असणार आहेत. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी प्रतीक्षायादीतील तिकिटांची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.