गणेश विसर्जन कार्यक्रमासाठी मुंबई सज्ज झाली असून यासाठी शहरातील वाहतूकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, शहरातील ५३ मार्ग उद्या बंद असणार आहेत. ५४ मार्गांवर एकेरी वाहतूक असेल तर ९९ मार्गांवर वाहने पार्क करण्यास बंदी असणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून उद्या १६ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी साडेतीन हजार पोलीस हे विशेष सेवा बजावणार आहेत. उद्या गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन महापालिका आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.

उद्या (५ सप्टेंबर) रोजी बदलण्यात आलेले मार्ग… (हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार)

बंद असणारे मार्ग…

दक्षिण मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा भारत माता जंक्शन ते बवला कंपाऊंड दरम्यान जड वाहनांसाठी सकाळी ६ वाजल्यापासून उद्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे. तर दुपारी ३ वाजल्यापासून बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग…

१) भारत माता जंक्शनपासून करी रोड पूलापर्यंत उजवीकडे वळता येणार आहे. पुढे डावीकडे वळून शिंगाटे मास्टर चौक – एन. एम. जोशी रोड – ऑर्थर रोड जंक्शन – एस. ब्रीज रोड – बाबासाहेब आंबेडकर रोड.
२) भारत माता जंक्शन येथून नाईक चौकाकडे डावीकडे वळून साईबाबा मार्ग – (डावीकडे) जी. डी. आंबेडकर मार्ग – श्रावण यशवंत चौक.

बंद असणारा मार्ग…

दक्षिण मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून जाताना गॅस कंपनी जंक्शन ते साने गुरुजी मार्ग बंद राहणार.

पर्यायी मार्ग…

ऑर्थर रोड नाका – डॉ. आंबेडकर रोड – उजवीकडे भारत माता जंक्शन – करी रोड रेल्वे पूल – डावीकडे शिंगाटे मास्टर चौक – एन. एम. जोशी मार्ग – ऑर्थर रोड नाका. त्यानंतर ऑर्थर रोड जंक्शन पासून गॅस कंपनी जंक्शन – काळा चौकी जंक्शन – त्यानंतर यु टर्न घेऊन बावल कम्पाऊंड.

उजवीकडे वळण्यास मनाई असलेले मार्ग…

साने गुरुजी मार्गाहून गॅस कंपनी चौकापर्यंत उजवीकडील रस्ता सर्व वाहनांसाठी बंद असणार आहे.

मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या ८ विशेष गाड्या…

मध्य रेल्वेकडून मंगळवार आणि बुधवार रात्री पर्यंत ८ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटल्यानंतर मुख्य लाईन आणि हार्बर लाईन या दोन्ही मार्गांवर धावणार आहेत. तसेच सर्व स्थानकांवर त्या थांबतील.

पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार दरम्यान ८ विशेष गाड्या…

ठाण्यातील वाहतुक मार्गांत करण्यात आलेले बदल…

१) नौपाडा भागातून तलावपाळी येथे विसर्जनाच्या वेळेस दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करण्यास मनाई.
२) कोपरी सर्कल ते गोकुळधाम सोसायटी येथील जाणाऱ्या बसेसला कोपरी सर्कल येथे मनाई. तसेच कंपनीच्या बसेस तसेच मोठ्या गाडयांना मनाई.
३) घोडंबदर रोडवरील जडवाहनांना गायमुख येथे प्रवेश बंद. त्यांना खारेगाव टोल नाका येथून इचछीत स्थळी जाता येणार आहे.
४) पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौक गोल्डन डाइज नाका येथे प्रवेश बंद.
५) भिवंडी येथून बाळकूम नाका, नवी मुंबईहुन खारेगाव टोल नाका, आनंद नगर चेक नाका येथे देखील जड वाहतूक थांबवणार.

Story img Loader