मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर विविध साथीचे आजार डोके वर काढत असून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव खासगी पॅथॉलॉजी लॅबच्या पत्थ्यावर पडत आहे. राज्य सरकारने साथीच्या आजारांच्या चाचण्याचे दर निश्चित केले आहेत. मात्र राज्यातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये चाचण्यांसाठी अतिरिक्त दर आकारण्यात येत असून त्यामुळे रुग्णांची लुबाडणूक होत आहे. दरम्यान, वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णांकडून दामदुप्पट रक्कम वसूल करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबईसह राज्यातील नागरिक साथीच्या आजारांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. राज्यातील विविध भागांतील अनेक खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये या रुग्णांच्या चाचण्या करण्यात येतात. मात्र चाचण्यांसाठी निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत आहे. आरोग्य विभागाने डेंग्यूच्या चाचणीसाठी ६०० रुपये व स्वाईन फ्ल्यूच्या चाचणीसाठी साडेतीन ते पाच हजार रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये मनमानी कारभार सुरू असून रुग्णांकडून अधिक पैसे उकळण्यात येत आहेत. रक्त तपासणीचा अहवाल तातडीने मिळवण्यासाठी रुग्णांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. रुग्णाच्या घरी जाऊन रक्त तपासण्याच्या सुविधेसाठी दुप्पट शुल्क आकारणी करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! सहाय्यक कायदा अधिकारी पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती

अशा विविध पद्धतीने खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून रुग्णांची लुबाडणूक होत असून रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी डेंग्यूच्या चाचणीसाठी प्रत्येकी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नयेत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ सप्टेंबर २०१६ रोजी खासगी पॅथॉलॉजी लॅबना दिले आहेत. परंतु खासगी पॅथॉलॉजी लॅबकडून या निर्देशांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. राज्य सरकारने चाचण्यांच्या शुल्का संदर्भात निर्देश दिले. मात्र त्यांची अमलबजावणी करण्यासाठी, तसेच चाचण्या योग्य प्रकारे होत आहेत की नाही हे तपासणारी यंत्रणा सरकाने उभारली नाही. चाचण्या योग्य प्रकारे होण्यासाठी सरकारने पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ही नोंदणी होत नाही, तोपर्यंत लॅबकडून करण्यात येणाऱ्या चाचण्या आणि त्यांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे, असे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.