पात्रता निकष पायदळी तुडवून उभारण्यात आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या नवी मुंबईतील वादग्रस्त महाविद्यालयाला अखेर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या महाविद्यालयातील गैरसोयीसंदर्भात युवा सेनेचे सदस्य दिलीप करंडे यांनी गुरुवारी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्ताव आणून चर्चेला तोंड फोडले. त्यावर या महाविद्यालयाकडून खुलासा मागविण्यात आल्याची माहिती कुलगुरूंनी अधिसभेला दिली. राजेश टोपेंच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वानवा, पिण्याचे पाणी, ग्रंथालय, वर्गखोल्या, खेळाचे मैदान, संगणक आदी अनेक मूलभूत सुविधांचीही सोय नाही. त्यामुळे, याची चौकशी करण्याची मागणी मनविसेनेने केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chargesheet notice to higher education ministers collage