एसटीने अलीकडेच सुरू केलेल्या मुंबई-बंगळुरू शिवनेरी व्होल्वो बससेवेला कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महांडळाने मुंबईसह राज्यातील विविध भागांत ऐरावत बससेवा सुरू करून आपल्या ताकदीची झलक दाखविली. त्यातही ऐरावतचा निवांत प्रवास १५०० रुपयांत होत असताना एसटीच्या व्होल्वोसाठी मात्र तब्बल २१८० रुपये मोजावे लागणार आहेत.
एसटीने बुधवारपासून मुंबई-बंगळुरू व्होल्वो बससेवा सुरू केली. दररोज दुपारी केवळ एक बस मुंबईहून बंगळुरूसाठी सुटणार आहे. मात्र त्याचवेळी कर्नाटकने मुंबई-बंगळुरूसाठी दररोज सहा तर कोल्हापूर, पुणे, शिर्डी या शहरांसाठी म्हैसूर, मंगलोर, बंगळुरू, शिमोगा येथून बससेवा सुरू केली आहे.

Story img Loader