शून्य टक्क्याने कर्ज देण्याची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये देऊन लुटणाऱ्या तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. आकाश चॅटर्जी असे या तरुणाचे नाव असून गुरुवारी त्याला वरळीतील झोपडपट्टीतून अटक करण्यात आली. आकाशने २५ मार्च रोजी नामांकित वृत्तपत्रांमध्ये शून्य टक्क्याने व्यक्तिगत कर्ज उपलब्ध, अशी जाहिरात दिली होती. जाहिरातीत आकाशने आपले वाळकेश्वर येथील उच्चभ्रू वस्तीत कार्यालय असल्याचे आणि तेथेच कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन येण्याचे आवाहन केले होते.
फिर्यादी रवींद्र कांबळे यांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकाद्वारे आकाशला संपर्क साधला. आकाशने कांबळे यांना दीड लाख रुपयांचे कर्ज देण्यास तयार असल्याचे सांगून प्रक्रिया शुल्क १० हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु प्रक्रिया शुल्क भरूनही कर्ज न मिळाल्याने कांबळे यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, आकाशने अशाप्रकारे जाहिरातबाजी करून किती जणांना फसवले आहे, याचा पोलीस तपास करीत
आहेत.

Story img Loader