स्वस्तात मोटरगाडी आणि सीमाशुल्क विभागाच्या भंगाराच्या कंत्राटातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका पोलीस शिपायासह त्याचे नातेवाईक-मित्रांना सुमारे ४८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी योगेश प्रभाकर अहिरे याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून यापूर्वीही त्याच्यविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर येथे राहणारे तक्रारदार अमोल गोविंद चव्हाण मूळचे सोलापूरचे रहिवाशी आहेत. ते सध्या कुर्ला पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पाच वर्षांपूर्वी ते संरक्षण आणि सुरक्षा विभागात होते. यावेळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात होते. त्यावेळी तांत्रिक विभागातील पोलिसासोबत त्यांची ओळख झाली होती.

हेही वाचा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “महाराष्ट्राच्या खासदारांनी…”

योगेश अहिरे त्या पोलिसाचा मित्र होता. योगेश हा सीमा शुल्क विभागात अधिकारी असून त्याच्या भावासोबत त्याचा भागिदारीमध्ये स्वत:चा व्यवसाय आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना दुचाकी व मोटरगाड्या स्वस्तात मिळवून दिल्या आहेत. त्यात काही पोलीस आणि सीमासुल्क अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असे तक्रारदार चव्हाण यांना कळाले. तसेच अहिरे बंधू हे सीमा शुल्क विभागात होणाऱ्या लीलावात वस्तू खरेदी करून त्या जास्त किंमतीत विकतात असे तांत्रिक विभागातील त्या पोलिसांना सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तक्रारदार अमोल चव्हाणने त्याला एक मोटरगाडी स्वस्तात मिळवून देण्याची विनंती केली होती.

हेही वाचा : नवी मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींसाठी उंचीचे नियम शिथिल ? ; एएआयला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

यावेळी त्याने एक मोटरगाडी विक्रीसाठी आली असून कारची किंमत २२ लाख रुपये आहे. ती मोटरगाडी त्याला पंधरा लाख रुपयांमध्ये देतो असे सांगितले होते. अमोलसह १० नातेवाईक व परिचीत व्यायक्तींनी दुचाकी व मोटरगाडीसाठी ५६ लाख ६० हजार रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर या दोघांनी ४५ दिवसांत गाड्या देण्याचे आश्वासन दिले. पण ते पूर्ण करता आले नाही. त्यानंतर त्याने सीमाशुल्क विभागात दीड ते दोन कोटी रुपयांच्या लोखंडी सळ्या, क्रेनचे भंगार आले असून कस्टमने ते भंगार विक्रीसाठी काढले आहे. ते भंगार आपल्याला फक्त ६५ लाखांना मिळणार आहे. यावेळी त्याने त्याला ३२ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच तो स्वत: ३३ लाखा रुपये गुंतवणार असल्याचे त्याने सांगितले. या संपूर्ण व्यवहारात १५ लाख नफा मिळेल, असे त्याने ठासून सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून अमोल चव्हाणने कर्ज काढून व दागिने विकून ३० लाख रुपये दिले. पण पैसे मिळाले नाही.

हेही वाचा : बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

आरोपीने दिलेला धनादेशही वठला नाही. त्यामुळे त्यांनी या दोघांविरुद्ध खेरवाडी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. अखेर योगेश अहिरेने अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating of police constables with the lure of cheap cars scrap contracts the main accused who embezzled rs 48 lakhs was arrested in mumbai print news tmb 01