मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक विवेक बिमनवार यांच्या वैयक्तिक खात्यातून ६० हजार रुपये फसवणुकीने काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी सायबर गुन्हे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
बिमनवार यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून गेल्या दोन-तीन दिवसांपासून दूरध्वनी येत होता. मंगळवारीही हा दूरध्वनी पुन्हा आला. त्यावेळी संबधित इसमाने त्यांची जन्मदिनांक तसेच इतर तपशील विचारला. त्यानंतर त्यांचा खात्याचा वनटाईम पासवर्ड विचारला आणि तुम्हाला नवा पिन देऊ असे सांगितले. सुरक्षेस्तव वन टाईम पासवर्ड महत्त्वाचे असल्याचे या इसमाने सांगितले. बिमनवार यांनी वनटाईम पासवर्ड दिल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या खात्यातून ६० हजार रुपये काढले गेल्याचा लघुसंदेश त्यांना मिळाला. त्यानंतर लगेचच त्यांनी बँकेकडे चौकशी केली तेव्हा वनटाईम पासवर्डचा वापर करून पैसे काढल्याचे त्यांना सांगण्यात आले. आपण फसविले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
आदित्य, सुरज पांचोली यांच्या घराची झडती
मुंबई : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी मुंबईत अभिनेता आदित्य पांचोली व त्याचा मुलगा सुरज पांचोली यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत पोलिसांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. जिया खान हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात सुरज पांचोली याचे नाव घेतले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा