मुंबई : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली चेंबूर पोलिसांनी शुक्रवारी तिघांना अटक केली. आरोपींनी पीडित मुलीला निर्जनस्थळी नेले आणि त्यांच्यापैकी एकाने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित मुलगी १७ वर्षांची असून आरोपींपैकी एक तरूण पीडित मुलीच्या ओळखीचा होता. त्याने पीडित मुलीला काला रोड परिसरात काही काम असल्याचे सांगून बोलावले होते. त्यानंतर परीचित तरूणासोबत असलेल्या दुसऱ्या आरोपीने पीडित मुलीला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या तिसऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीने पीडित मुलीला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

हेही वाचा…चाकूचा धाक दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

याप्रकरणानंतर पीडित मुलीने शुक्रवारी चेंबूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (ए) (आय), ७०, ३ (५) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी २७, २० व ३७ वर्ष वयोगटातील आहेत. याप्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.