बंद पडणाऱ्या उद्वाहनामुळे नागरिकांत भीती
महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांची कार्यालये असलेले चेंबूरमधील समाज कल्याण कार्यालय सध्या येथील गैरसाईमुळे मोठय़ा चर्चेत आहे. याठिकाणी असलेली लिफ्ट (उद्वाहन) वारंवार बंद पडत असल्याने येथील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्र पूर्णपणे निकामी असल्याने आगीसारखी घटना घडल्यास याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची भीती काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीची असलेल्या या इमारतीमध्ये तळ मजल्यावर सार्वजनिक बांधकाम सेवा केंद्र आणि शिधावाटप कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर उद्वाहक निरीक्षक कार्यालय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग कार्यालय आहे. तर दुसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता मुंबई बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आणि अल्पबचत संचालनालय यांचे कार्यालय आहे. तिसऱ्या मजल्यावर विद्युत निरीक्षक आणि आण्णाभाऊ साठे महामंडळ यांचे कार्यालय आहे. याशिवाय चौथ्या मजल्यावर विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय व विकास महामंडळ, पोलीस उपायुक्त झोन सहा, आणि चेंबूर सहाय्यक आयुक्त यांची कार्यालये आहेत.
राज्य शासनांतर्गत येणाऱ्या अनेक विभागाची कार्यालये या ठिकाणी असल्याने रोजच मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण लिफ्टचाच वापर करतात. मात्र या ठिकाणी असलेली लिफ्ट अनेकदा बंद पडत असल्याने रोज एकतरी इसम या लिफ्टमध्ये अडकला जातो. त्यानंतर त्याची सुटका केली जाते. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती असल्याने ते जिन्यांचाच वापर करत आपले कार्यालयात गाठतात. मात्र कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या लिफ्टमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
शहरातील इमारतींसाठी लागणाऱ्या लिफ्टचा नाहरकतपत्र याच इमारतीमधील उद्वाहक निरीक्षक कार्यालयातून घेतले जाते. मात्र त्यांच्याच इमारतीमध्ये अशा प्रकारे लिफ्टची दुरवस्था असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर इमारतीमध्ये आगीसारखी दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी आग रोखण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही.
दहा ते बारा वर्षांपूर्वी या ठिकाणी प्रत्येक मजल्यावर अग्निरोधक फवारणी यंत्र बसवण्यात आले आहे. मात्र या सर्व यंत्रांची मुदत संपल्याने ती पूर्णपणे निकामी झाल्याचे सांगण्यात आले.
सुरक्षारक्षकच नाही
या ठिकाणी असलेल्या सर्वच कार्यालयांची सुरक्षा ही रामभरोसे आहे. एकाही कार्यालयाबाहेर आणि इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकही सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे एखादी अपरिचित घटना घडण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. शिवाय या इमारतीची संरक्षण भिंतदेखील अनेक ठिकाणी तुटल्याने इमारती परिसरात रात्रीच्या वेळेस मोठय़ा प्रमाणात दारुडय़ांचा पाटर्य़ादेखील सुरू असतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणीदेखील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.