वरळी येथे आर्याका कोलबाटकर हिच्या घरी जाऊन बुधवारी पहाटे रसायन हल्ला करणाऱ्या तिचा प्रियकर जेरीट जॉन याला पोलिसांनी शनिवारी पकडले. नालासोपारा पोलिसांनी त्याला शनिवारी दादर पोलिसांच्या स्वाधीन केले.
बुधवारी जेरीट जॉनने आपली प्रेयसी आर्याका कोलबाटकर हिच्यावर रसायन हल्ला केला होता. त्यात तिच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तातडीने आर्याकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान जेरीट जॉन फरार झाला होता. दादार पोलीस ठाण्यात आर्याकाकडून तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भातील वृत्तांमध्ये जेरीट जॉनचे छायाचित्र वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. ते छायाचित्र नालासोपारा येथील मंथन हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पाहिले आणि छायाचित्रातील व्यक्ती आपल्याच हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असल्याचे हॉटेल मालकाला सांगण्यात आले. हॉटेल मालकाने त्वरित नालासोपारा पोलिसांना पाचारण केले. नालासोपारा पोलिसांनी जेरीट जॉनला ताब्यात घेऊन दादर पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी जॉनच्या घरातून रसायनाचे नमुने घेऊन ते वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठिवले असून हे रसायन अ‍ॅसिड नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. आर्याका आणि जॉनची मैत्री फेसबुकवर झाली होती. त्या मैत्रीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले. परंतु, जेरीट जॉनचे अगोदरच लग्न झाले असून त्याला पाच वर्षांचा मुलगा आहे हे समजल्यानंतर आर्याकाने संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात बोलण्यासाठी आर्याकाने दोन दिवसांपूर्वी बोलावून घेतले. त्यावेळी त्यांच्यात बराच
वाद झाला. त्याचा राग मनात धरून जेरीट जॉनने आर्याकावर रसायन हल्ला केला.    

Story img Loader