‘रीगल सिनेमा’समोरच्या शामाप्रसाद मुखर्जी चौकात आणि त्याला जणू जोडूनच असणाऱ्या काळा घोडा चौकात (अधिकृत नाव नेताजी सुभाषचंद्र बोस चौक) असलेल्या तीन दालनांमध्ये चित्रं, शिल्पं/ मांडणशिल्पं आणि फोटोग्राफी यांची मिळून नऊ प्रदर्शनं सध्या सुरू आहेत.. ती सर्व नीट पाहायची म्हटलं तरी तीन तास सहज लागतील. तेवढा वेळ काढण्याची सवय नसली, तर ती या आठवडय़ापासूनच करायला हवी.. कारण दिवाळीनंतर जो ‘कलाप्रदर्शनांचा मौसम’ सुरू होतो, त्यात यंदा यापुढे फेब्रुवारीपर्यंत अशीच भरपूर प्रदर्शनं भरताहेत. खादी भांडारामागे (बुद्ध भवनच्या सिद्धार्थ कॉलेजनजीक) असलेल्या ‘क्वीन्स मॅन्शन’मधल्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड गॅलरी’नं सूनी तारापोरवाला यांचं प्रदर्शन (३१ ऑक्टोबपर्यंतच) भरवून या ‘सीझन’ची नांदी केलेलीच आहे.. आता खासगी मालकीच्या अन्य गॅलऱ्यांतही प्रदर्शनं सुरू होतील! पण सध्या आपण रीगलच्या चौकाभोवती किंवा काळा घोडा भागातच फिरू.

या नऊ प्रदर्शनांपैकी एक म्हणजे नाशिक येथील कला-प्राध्यापक संजय साबळे यांचं. ‘जहांगीर’च्या पहिल्या वातानुकूल दालनात ते भरलं आहे. स्त्रीजीवनाच्या अवस्था, स्त्रीच्या आयुष्यातले क्षण टिपतानाच स्त्रीबद्दलची वैश्विक जाणीव देणारी चित्रं इथं पाहता येतील. उरलेल्या आठ प्रदर्शनांपैकी तीन सिंहावलोकनं (रिट्रोस्पेक्टिव्ह) आहेत. ज्येष्ठ चित्रकार शक्ती बर्मन आणि दिवंगत चित्रकार शिवाक्ष चावडा यांचं समग्र काम दाखवू पाहणारी ही सिंहावलोकनी प्रदर्शनं पाहायला हवीतच. पण ‘पिसुवरे’ या नावानं वावरणाऱ्या आणि फार ज्येष्ठ नसलेल्या एका हुन्नरी चित्रकारानं गेल्या सुमारे २५ वर्षांत केलेल्या कामाचं अगदी छोटेखानी म्हणावं असं प्रदर्शनही मुद्दाम बघायला हवं! याखेरीज चौघा तरुणांची प्रदर्शनं पाहण्यासारखी आहेत. यात ‘जहांगीर’मध्ये पुडुचेरीचे (जुनं नाव पाँडिचेरी) व्यंकटेशन आणि धनशेखर हे दोघे, ‘जहांगीर’च्याच गच्चीतल्या छायाचित्र-दालनात ठाण्याला राहणारे राजेश जोशी यांनी युरोप-दौऱ्यात टिपलेली ‘पिक्टोरिअल’ छायाचित्रं, ‘जहांगीर’च्या तिसऱ्या वातानुकूल दालनात कुलदीप कारेगावकर यांचं मांडणशिल्प- व्हिडीओ या नवप्रकारांशी ड्रॉइंग्ज आणि रंगचित्रांचा मेळ घालणारं प्रदर्शन आणि ‘क्लार्क हाऊस’ नावाच्या गॅलरीत पाराशर नाईक यांची मांडणशिल्पं यांचा समावेश आहे.

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
genelia deshmukh shares her opinion on parenting
रितेशची बाबा म्हणून जबाबदारी, मातृत्व अन् मुलांचे संस्कार; जिनिलीयाने केलं पालकत्वावर भाष्य, देशमुखांची सून म्हणाली…
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
saif ali khan amrita singh marriage story
सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ

बहरातले (आणि नंतरचे) बर्मन

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टमध्ये) शक्ती बर्मन यांच्या जीवनकार्याचं सिंहावलोकनी प्रदर्शन सुरू आहे. कवी आणि समीक्षक रणजित होस्कोटे हे या प्रदर्शनाचे गुंफणकार (किंवा विचारनियोजक, क्युरेटर) असल्यानं होस्कोटेंची संवेदनशीलता चित्रमांडणीतून आणि त्यासोबत भिंतीवर लावलेल्या लिखाणातून दिसते. या पाच मजली गॅलरीत तळमजल्यावर शक्ती यांच्या एकंदर कलेचे निवडक नमुने आणि या विषयप्रवेशानंतर पुढल्या मजल्यांवर एकेका तपशिलाचं अवलोकन, अशी -जणू पुस्तकासारखीच- रचना या प्रदर्शनात दिसेल. शक्ती बर्मन यांची १९६३ ते ६५ या काळातली कलावृत्ती अतिशय बहरास आलेली होती, असा एक निष्कर्ष या प्रदर्शनातून काहींना काढता येईल. पण मग पुढे शक्ती बर्मन यांनी स्वत:च्या चित्रांच्या आवृत्त्या काढल्या काय? तसंच काही नाही, असं हे प्रदर्शन ठामपणे सांगतं! शक्ती बर्मन म्हटल्यावर जी रंगबिंदू दाखवणारी शैली आठवते, तिच्यापेक्षा निराळी भरपूर चित्रं इथं आहेत आणि नेहमीच्या भासणाऱ्या त्या शैलीतसुद्धा शक्ती यांनी विषयवेध कायम ठेवला होता. एक भारतीय चित्रकार म्हणून आपल्या आधुनिकतेला परंपरेच्या सान्निध्याचा रंगही आहे, हे विविध प्रकारे शक्ती सांगत होते!

चावडा यांचं वैविध्य

शक्ती यांच्याआधी हेच सांगणारे चित्रकार अनेक (उदाहरणार्थ हुसेन, हेब्बर, डीजी कुलकर्णी) आहेतच, पण प्रत्येकानं ते निरनिराळ्या प्रकारे सांगितलं, हे वैविध्य. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या सभागृह दालनात दिवंगत चित्रकार शिवाक्ष चावडा यांच्या चित्रांचं भरलेलं सिंहावलोकनी प्रदर्शन, १९३७ (विद्यार्थिदशेतलं काम) ते १९७६ या सुमारे ४० वर्षांतल्या कामाचं आहे. यापैकी १९५०च्या दशकातली चावडा यांची चित्रं यापूर्वी कधी दिसलेली नाहीत. चावडांनी भारतीय नृत्यप्रकारांवर केलेली चित्रं बऱ्याचदा पाहायला मिळतात, ती इथं आहेतच पण फिकट पेस्टल छटांमध्ये तैलरंग वापरून १९६३ ते ६५ या वर्षांत केलेली आधुनिक लोकजीवनाची चावडाकृत चित्रं क्वचितच कुणी पाहिली असतील! चावडा यांची रेषा सरळ होती, आकार आधुनिकतावादी चित्रपद्धतीला शोभणारे चौकोनी-त्रिकोणी होते ते पुढे भारतीयतेच्या शोधात गोलसर होत गेले, हेही इथं ३० ऑक्टोबपर्यंत प्रत्यक्ष पाहायला मिळेल.