खारघर येथील ‘हेक्स वर्ल्ड सिटी’च्या गुंतवणूकदारांची ४५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर रविवारी तपास यंत्रणेने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात घालवला. २४ तास उलटूनही नवी मुंबई पोलिसांनी हेक्स वर्ल्ड सिटीच्या कार्यालयांवर अद्याप कोणतीही विचारपूस केली नाही.
पंकज व समीर भुजबळ हे भागीदार असलेल्या हेक्स सीटीमधील गुंतवणूकदारांना २००९ साली घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराच्या किमतीच्या आठ टक्के रक्कम आगाऊ देऊनही घर ताब्यात न मिळाल्याने या पीडितांनी यापूर्वीही भुजबळ बंधू भागीदार असलेल्या देवीशा इन्फ्रास्ट्रक्चरविरोधात बैठका घेतल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal