महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा वाढ केली. दोघांच्या न्यायालयीन कोठडीत ११ मेपर्यंत वाढ करण्यात आली. याआधी वाढ करण्यात आलेल्या कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने दोघांचीही कोठडी वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने भुजबळ काका-पुतण्याच्या कोठडीत ११ मेपर्यंत वाढ केली.
दोनच दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

Story img Loader