शीना बोरा हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची आर्थर रोड कारागृहातील वास्तव्यादरम्यान चांगलीच गट्टी जमल्याची माहिती समोर येत आहे. सध्या भुजबळांना घरचे जेवण घेण्याची परवानगी नसल्यामुळे हे दोघेजण सध्या पीटर यांच्या घरून येणारा डबा एकत्र खात असल्याचे वृत्त आहे. भुजबळांनी न्यायालयाकडे घरचे जेवण घेण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे २००८ मध्ये छगन भुजबळ मंत्री असताना त्यांनी आर्थर रोड कारागृहात स्पेशल सेल उभारण्याचे आदेश दिले होते. या सेलमध्ये मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते. मात्र, कसाबच्या फाशीनंतर ही सेल विविध बराकींमध्ये विभागण्यात आली होती. यापैकी १२ क्रमांकाच्या बराकीत भुजबळांची रवानगी करण्यात आली आहे. या बराकीत ७ ते ८ कैदी असून त्यामध्ये पीटर मुखर्जी आणि अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांचाही समावेश आहे. ही बराक सर्वसामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आली असून ही तुरूंगातील सर्वात सुरक्षित जागा समजली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा