छापासत्रात डोळे दिपविणारी मालमत्ता समोर
महात्मा फुले यांचे नाव घेत सामाजिक समतेचा लढा देणारे ‘समाजसेवक’, राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्धच्या चौकशीची चक्रे मंगळवारी अधिक वेगाने फिरू लागली. भुजबळ आणि कुटुंबियांच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, लोणावळा येथील विविध मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती सुरू केली आणि एकेकाळी फूल बाजारात फुले विकणाऱ्या भुजबळ यांच्या कुटुंबाची राजकारणात शिरल्यानंतरची आश्चर्यचकित करणारी भरभराट महाराष्ट्रासमोर अधिकृतपणे उघड झाली. मंगळवारी दिवसभर चाललेल्या या छाप्यांनंतर भुजबळ यांच्या मालमत्तेचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच उघड केला. आलिशान महाल, बंगले, इमारती, सदनिका, विस्तीर्ण भूखंड, ऐतिहासिक मोलाच्या प्राचीन वस्तू असा डोळे दिपविणारा खजिना या तपासात उघड झाला..

* चंद्राई बंगला, भुजबळ फार्म- ४००० चौ. फुटांचा बंगला
* भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म-  ४६,५०० चौ. फुटांचा बंगला, २५ बेडरूम्स. किंमत शंभर कोटी रुपये
* येवला येथील बंगला-  ५००० चौ. फूट, ११ खोल्या
* मनमाड येथील बंगला व कार्यालय- ३००० चौरस फूट, ५ खोल्या 4राम बंगला १५०० चौरस फूट

* पी.एच ७, बी विंग, मारुती एन्क्लेव्ह, बेलापूर- १३५० चौ. फुटांची सदनिका, तसेच ए विंगमध्ये भुजबळ ग्रुप कंपनीची सदनिका
*१०५, बी विंग, मारुती पॅराडाईज, बेलापूर-  १३०५ चौ.  फुटांची सदनिका तसेच ९ गाळे. २ गाळे भाडय़ाने, २ गाळे बंद
*१०२, एव्हरेस्ट सोसायटी, बेलापूर- १३०० चौ. फु. सदनिका
* लाजवंती बंगला, प्लॉट क्र ४६, बेलापूर- १३०० चौरस फुटांची सदनिका

* लोणावळा येथील बंगला-  २.८२ हेक्टर जागेत ६ बेडरूम्सचा बंगला.
* मावळ तालुक्यात ६५ एकर जमीन- फर्निचर, स्विमिंग पूल, हेलिपॅड, बंधारा, ५ कोटींची झाडे
* फ्लॅट क्र. २०८, ग्राफिकॉन आर्केड, संगमवाडी निवासस्थान बंद अवस्थेत.

* सुखदा सोसायटी, वरळी २००० चौ. फुटांची सदनिका
* मिलेशिया अपार्टमेंट, माझगाव ६०० चौ. फुटांच्या ३ सदनिका,  माणिक महल, ५ व ७ वा मजला  १२०० चौ. फुटाच्या दोन सदनिका.
* सागर मंदिर सोसायटी, शिवाजी पार्क- ६०० चौ. फु. सदनिका
* साईकुंज बिल्डिंग, दादर (पू.)- फ्लॅट क्र. २, ४, ५, ७ या १५००, १२०० चौ. फू. सदनिका तळमजला दुकान, १५०० चौ. फू.
*  सॉलिटेअर बिल्डिंग, सांताक्रुझ- पूर्ण ५, ७, ८ वा मजला. २५०० चौ. फुटाच्या तीन सदनिका.

Story img Loader