छापासत्रात डोळे दिपविणारी मालमत्ता समोर
महात्मा फुले यांचे नाव घेत सामाजिक समतेचा लढा देणारे ‘समाजसेवक’, राष्ट्रवादी काँग्रेसचे बिनीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्धच्या चौकशीची चक्रे मंगळवारी अधिक वेगाने फिरू लागली. भुजबळ आणि कुटुंबियांच्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, लोणावळा येथील विविध मालमत्तांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती सुरू केली आणि एकेकाळी फूल बाजारात फुले विकणाऱ्या भुजबळ यांच्या कुटुंबाची राजकारणात शिरल्यानंतरची आश्चर्यचकित करणारी भरभराट महाराष्ट्रासमोर अधिकृतपणे उघड झाली. मंगळवारी दिवसभर चाललेल्या या छाप्यांनंतर भुजबळ यांच्या मालमत्तेचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेच उघड केला. आलिशान महाल, बंगले, इमारती, सदनिका, विस्तीर्ण भूखंड, ऐतिहासिक मोलाच्या प्राचीन वस्तू असा डोळे दिपविणारा खजिना या तपासात उघड झाला..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा