काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये काही दिवसांपूर्वी तुरूंगात रवानगी झालेल्या छगन भुजबळ यांचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड मान असणाऱ्या भुजबळांची या छायाचित्रातील अवस्था अगदी केविलवाणी दिसते. यामध्ये विस्कटलेले केस, पांढरी दाढी आणि थकलेल्या अवस्थेत व्हिलचेअरवर बसलेले छगन भुजबळ दिसत आहेत. सुरूवातीला हे छायाचित्र फोटोशॉपचा वापर करून तयार करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, भुजबळांचे हे छायाचित्र खरे असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, एकेकाळी ढाण्या वाघ म्हणून वावरलेल्या भुजबळांच्या अवस्थेबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी भुजबळ यांना दातांच्या उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांना रूग्णालयात कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली नव्हती. रूग्णालयात त्यांच्या तपासण्या व चाचण्या सुरू असताना सिटी स्कॅन खोलीबाहेर नंबर येण्याची वाट पाहत असलेल्या भुजबळांचे हे छायाचित्र असल्याची माहिती मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा