पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मित्रों..’ ही खास शैलीतील साद विधानसभेत घुमली, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सरकारच्या आश्वासने आणि घोषणांची
अतिशय क्लिष्ट आणि बोजड मराठी भाषा अभिभाषणात वापरली असल्याचे दाखले देत भुजबळ यांनी आपली फटकेबाजी सुरु केली. आपल्या शैलीतील हावभाव आणि भात्यातील तीर सोडत ‘अहो, वाक्यांचा नेमका अर्थ सां
शिवसेना आणि भुजबळ यांचे ‘जुने प्रेमसंबंध’. त्यामुळे मुंबईचा विकास आराखडा ‘चुलीत टाका’, जैतापूर प्रकल्प गुजरातला न्या, अशी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांचे दाखले देण्यास भुजबळ यांनी सुरुवात केल्यावर शिवसेना आमदार अस्वस्थ झाले. मुंबईतून मराठी माणसाची हद्दपारी, मंत्र्यांचे अधिकार आणि भाजप-शिवसेनेतील कुरबुरींचा उल्लेख त्यांनी केला. ठाकरे यांच्याविषयीचे टोमणे असह्य़ झाल्यावर माजी
राज्य सरकारची कामगिरी व धोरणे मांडणाऱ्या प्रत्येक मुद्दय़ांमधील खोड सांगत टोले लगावण्याची एकही संधी भुजबळ यांनी सोडली नाही आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उखळी तोफांचा भडिमार केला. भाजपमधील ज्येष्ठांना बाजूला सारुन अतिशय तरुणपणी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याने त्यांनी आपला प्रभाव दिल्लीदरबारी दाखवून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अधिक निधी मिळवावा आणि कुंभमेळ्यासाठीही अनुदान पदरात पाडून घ्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. मंत्रमुग्ध करुन टाकणारी वक्तृत्वशैली, हजरजबाबीपणा आणि कसदार अभिनयकौशल्य याच्या जोरावर भुजबळ यांनी बुधवारी विधानसभा तब्बल दीड तास गाजवली.
तोफखाना..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मित्रों..’ ही खास शैलीतील साद विधानसभेत घुमली, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सरकारच्या आश्वासने आणि घोषणांची पिसे काढताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्या खाशा ढंगात असा काही निशाणा साधला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-03-2015 at 04:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal speech in assembly