मुंबई : राज्य पर्यटन विभाग विभागाच्या वतीने जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर १७ ते १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. हिंदवी स्वराज्य महोत्सवाच्या या कार्यक्रमात तीन दिवस महाराष्ट्राची संस्कृती, कला, लोककला, सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Story img Loader