लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मालवण शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात खटला चालवला जावा असे कोणतेही कारण किंवा पुरावे आढळून येत नाही, असे नमूद करून उच्च न्यायालयाने गुरूवारी त्यांना जामीन मंजूर केला. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिवपुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावरी मात्र न्यायालय २५ नोव्हेंबर रोजी तपशीलवार सुनावणी घेणार आहे.

five percent increase in voter turnout
मतदानात पाच टक्के वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
One arrested in connection with suspicious transactions worth Rs 125 crore
मुंबई : १२५ कोटीच्या संशयित व्यवहारांप्रकरणी एकाला अटक
In Bhosari assembly former corporator Ravi Landge supported NCP candidate Ajit Gavane
भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
Maharashtra Election Result
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या

पाटील यांची पुतळ्याचे बांधकाम अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली नव्हती किंवा त्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले नव्हते. पाटील यांनी केवळ पुतळ्याचा पाया स्थिर आणि मजबूत आहे की नाही याचा अहवाल सादर केला होता. पुतळ्याच्या पडझडीनंतरही त्याचा पाया शाबूत होता, असे निरीक्षणही न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने पाटील यांना जामीन देताना प्रामुख्याने नमूद केले. घटनास्थळाच्या पाहणीशी संबंधित संयुक्त तपासणी समितीचा एक गोपनीय अहवाल सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केला. त्यातही पुतळ्याचा पाया मजबूत असल्याचे, त्यात काही दोष नसल्याचे नमूद करण्यात आल्याचे म्हटले होते.

आणखी वाचा-मुंबई : १२५ कोटीच्या संशयित व्यवहारांप्रकरणी एकाला अटक

तत्पूर्वी, सिंधुदर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपटे आणि पाटील या दोघांनीही जामिनिसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील आठवड्यात या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल झाल्याने दोघांनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागावी, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला होता. परंतु, दोन्ही आरोपींना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या याचिकांवर येथेच सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना आपटे याच्या याचिकेवर न्यायालयाने २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

आणखी वाचा-जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा ट्रेण्ड सुरूच… ‘करण अर्जुन’, ‘बीवी नंबर वन’ हे चित्रपट पुन:प्रदर्शित होणार

दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटेने जामिनाची मागणी करताना केला आहे. यापूर्वी, आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले आहे. परंतु, नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांमध्येच तक्रार नोंदवल्याचा दावा आपटेने याचिकेत केला आहे. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते, असा दावाही आपटे याने याचिकेत केला आहे. हा पुतळा अनेक शतके टिकेल आणि सुस्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे सर्व उपाय केल्याचा दावा देखील आपटे यांनी केला आहे.