बांधकाम व्यावसायिक अजय गोसालिया यांच्यावर गोळीबार करणारा छोटा राजन टोळीचा गुंड प्रकाश निकम उर्फ पक्या याला गुन्हे शाखा ११च्या पथकाने अटक केली. गेल्या सात महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
अजय गोसालिया यांच्यावर २८ ऑगस्ट २०१३ रोजी मालाडच्या इन्फिनिटी मॉलजवळ गोळीबार झाला होता. गुन्हे शाखेने या प्रकरणात एकूण ६ आरोपींना अटक केली होती. मात्र प्रत्यक्ष गोळीबार करणारा प्रकाश निकम फरारी होता. निकम सोमवारी दिवा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून निकम याला अटक करण्यात आली. निकम हा छोटा राजनचा मुंबईतील ‘हॅण्डलर’ सतीश काल्या याच्या संपर्कात होता. तुरुंगात ओळख झाल्यानंतर तो राजनसाठी काम करू लागला. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांकडून तो राजनसाठी खंडणी उकळत असे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी दिली.

Story img Loader