कुख्यात छोटा राजनचा मेव्हणा जयंत मुळे (५२) याला गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने ठाण्यातून अटक केली. नवी मुंबई येथील केबल व्यावासायिकाची हत्या करून तब्बल ९ वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. २३ मार्च २००५ रोजी त्याने नवी मुंबई येथील सुप्रीम सॅटेलाईट व्हिजन या केबल कंपनीचे मालक संजय गुप्ता याची नेरूळ येथील कार्यालयात घुसून गोळीबार करून हत्या केली होती.

Story img Loader