छोटा शकील टोळीच्या दोन सराईत गुंडाना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष तीनने लालबाग येथे सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडून तीन रिव्हॉल्वर, देशी कट्टा आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.  छोटा शकीलचे दोन सराईत गुंड शस्त्रांसह लालबाग येथील दिग्विजय टेक्साईल मिल येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ३ च्या पथकाला मिळाली होती.  त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अजगर कासिम शेख (३९) आणि नासिरुद्दीन समशुद्दीन शेख उर्फ नासिर बचकाना (३४) यांना अटक केली. त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आदी जबरी गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader