हत्येच्या प्रकरणात जामीन मिळवून फरारी झालेला मोक्का प्रकरणातला आरोपी सैय्यद आरिफ अली मुबस्सीर हुसेन (३०) याला पोलिसांनी पुन्हा अटक केली. हुसेन हा अंडरवल्र्ड डॉन छोटा शकील याचा हस्तक आहे. गेली चार वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता.
सैय्यद हुसेन आणि बंटी पांडे यांनी २००८मध्ये मरिन लाइन्स येथील शिवसागर हॉटेलच्या मालकाकडे खंडणी मागितली होती, परंतु खंडणी न मिळाल्याने त्याने हॉटेलच्या मालकावर गोळीबार केला होता. या गोळीबारात हॉटेलचा सुरक्षारक्षक ठार झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी हुसेनला ‘मोक्का’खाली अटक केली. हुसेनने ‘मोक्का’ला आव्हान देत जामीन मिळविला होता, परंतु  जामिनावर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला होता.  या  तो नेपाळ व उत्तर प्रदेशात वास्तव्यास असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली. बुधवारी तो जोगेश्वरी येथील बेहरामबाग येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा ८ चे पोलीस निरीक्षक सुनील माने आणि त्यांच्या पथकाने त्याला अटक केली

Story img Loader