मुंबई : महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक व वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

स्वातंत्र्य संग्राम, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रिय असलेल्या न्या. चपळगावकर यांना वडिलांकडूनच वैचारिकतेचा वारसा लाभला. त्यांचा मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राचा गाढा अभ्यास होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या लेखनात सहजता आणि वक्तृत्वात परखडता होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चरित्रात्मक लिखाणामुळे स्वामींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले. कथा, कवितांचे लेखन करतानाच वैचारिक लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी शब्दांच्या निवडीवर त्यांचा विशेष भर असे. त्यांची ग्रंथसंपदा हे मागे राहिलेले विचारधन आहे.

actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ravi Raja provided list of 30 big property tax defaulters to Municipal Commissioner
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत, एमएसआरडीसीने थकवला मालमत्ता कर
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
Devendra Fadnavis Said This Thing About Panipat War
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार! “पानिपत म्हणजे मराठी माणसाचा अभिमान, ज्या प्रकारे मराठ्यांनी…”

ज्येष्ठ विचारवंत व सिद्धहस्त लेखक

न्या. चपळगावकर यांनी मराठी साहित्य, भाषा व संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक, न्याय, व्यक्तिचित्रण व ललित लिखाण केले. आपल्या वैचारिक लिखाणातून समाजाला नेहमी जागृत आणि ज्ञानी करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर, राज्यातील साहित्य क्षेत्राची हानी झाली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

परखड भाष्यकार व कृतिशील विचारवंत हरपला

सामाजिक मुद्द्यांवर परखड भाष्य करणारा विचारवंत हरपला आहे. कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहताना नमूद केले.

व्यासंगी, उत्कृष्ट साहित्यिक, गाढे अभ्यासक, थोर विचारवंत, समीक्षक, अत्यंत कुशल-कुशाग्र कायदेपंडित व नि:स्पृह न्यायमूर्ती. पण अत्यंत साधी रहाणी. त्यांचे जीवन तरुण पिढीस प्रेरणादायी आहे. सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ठेवणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने समाजाची फार मोठी हानी झाली आहे. सुनील देशमुखन्यायमूर्ती (निवृत्त)

न्यायालयीन आणि साहित्यिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा पाठबळ देण्याचा हात कायम पाठीशी असायचा. नवोदितांना ते प्रोत्साहन द्यायचे. निवडणूक व्यवस्थेवरील व इतरही त्यांची पुस्तके मार्गदर्शक ठरणारी आहेत. संजय गंगापूरवालामुख्य न्यायमूर्ती (निवृत्त), मद्रास उच्च न्यायालय

Story img Loader