बदलापूर / मुंबई : महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी महायुती सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवीत आहे. विरोधकांकडून योजनेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असला तरी एकनाथ शिंदे हा शब्द पाळणारा भाऊ आहे. त्यामुळे आता महिलांनीही ‘आपलं लाडकं सरकार’ लक्षात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. दुसरीकडे त्यांनी योजनेच्या लाभार्थींशी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे चर्चाही केली.

भारताचा विकास महाराष्ट्राच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होत नाही. येणाऱ्या काळात अधिक गतीने विकासासाठी आपले सरकार काम करेल, असे मुख्यमंत्री बदलापूर येथील कार्यक्रमात म्हणाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र विरोधकांनी अपप्रचार केला की जमा झालेले पैसे काढून घेतले जातील. पण आमची ‘देना बँक’ आहे ‘लेना बँक’ नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. आधीचे सरकार हप्तेवसुली करणारे होते. आमचे सरकार हे गरजूंच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना ही कधीही बंद पडणार नाही. विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. महिलांना पैसे मिळू नये म्हणून विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या हेच खोडा घालणारे विरोधक तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना जोडा दाखवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
eknath shinde and popat dhotre friendship news
‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा
Eknath Shinde criticized opposition claiming elections sealed Dhanushyaban and Shiv Sena s fate
जनतेच्या न्यायालयात धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिक्कामोर्तब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde )
Eknath Shinde : “मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं”, उद्योगपतींसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा >>>मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता

दरम्यान, योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेचा अधिकृत कार्यक्रम शनिवारी पुण्यात होणार असून तत्पूर्वी लाभार्थींच्या खात्यांत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येकी दीड हजार रुपये जमा केले जात आहेत. शनिवारी सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतदेखील कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी काही लाभार्थी महिलांबरोबर संवाद साधला. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नसून कायमस्वरुपी असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. या योजनेमुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत. मुलांचे शालेय साहित्य, औषधे, छोटा-मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तर ‘‘आता तुम्हाला ‘मुख्यमंत्रीसर’ न म्हणता भाऊ म्हणेन… ’’, ‘‘सख्खा भाऊ विचारत नाही, पण मुख्यमंत्रीसाहेब पाठीशी सख्ख्या भावासारखे उभे राहिले…’’, ‘‘रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी मिळाली…’’ अशा शब्दांत लाभार्थीनी आपल्या भावना बोलून दाखविल्या. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते.

प्रसिद्धीसाठी २०० कोटी

लाकडी बहीण आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची माहिती घराघरात पोहोचविण्यासाठी तब्बल २०० कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पुढील महिनाभर योजनांच्या प्रसिद्धीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. माहितीपट, व्हिडीओ साँग्ज, जिंगल्स, चित्ररथ, कीर्तनाच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जाईल. तसेच वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, समाजमाध्यमे, रेडिओ, रेल्वे, एसटी गाड्या, मेट्रो तसेच होर्डिंग्जच्या माध्यमातूनही प्रसिद्धी केली जाणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चे पैसे बँक खात्यात जमा झाल्याचा भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटत आहे. भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Story img Loader