लोकसत्ता, प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : केंद्रात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता स्थापन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांचा सामावेश असणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना केली. शिवसेना हा पक्ष माझी खासगी मालमत्ता नाही. श्रीकांत यांनाही पक्षाच्या कामातच स्वारस्य आहे. त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिमंडळाचा निर्णय येत्या रविवारी गुणवत्तेनुसारच होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
केंद्रात महायुतीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला यंदा किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून यासाठी काही नावे चर्चेत असली तरी त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी पक्षाच्या काही खासदारांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना भेटून केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र श्रीकांत पक्ष संघटनेतच काम करेल अशी स्पष्टोक्ती लोकसत्ताशी बोलताना केली. श्रीकांत यांना पक्ष संघटनेत अधिक रस आहे. राज्याच्या ग्रामीण भागात संघटना अधिक जोमाने वाढावी यासाठी ते काम करू पाहतात त्यामुळे श्रीकांत यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊ नये, असे माझेही मत आहे असे स्पष्ट केले. या पक्षाचे आमदार, खासदार, कार्यकर्ते माझ्या कुटुंबासारखे आहेत.