पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईतील विविध विकास प्रकाल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांचे लोकार्पण आणि काही विकासकामांचे भूमिपूजन करुन एकप्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली असल्याची चर्चा आहे. मात्र यावेळी निवडणुकीची तयारी करत असताना संभाव्या युतीचीही घोषणा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या जबल इंजिन सरकारने मुंबईचा विकास करुन दाखविला आहे. आता ट्रिपल इंजिन मुंबईत काय करणार हे पाहाच? शिंदे गट आणि भाजपाची युती असताना हे तिसरे ‘इंजिन’ कुणाचे याची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ट्रिपल इंजिन दिसेल

आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा आहे. मागच्या २५ वर्षांत जे झाले नाही, ते आम्हाला करुन दाखवायचे आहे. कुणी कितीही टीका केली, तरी मुंबईकरांना आमचे काम दिसत आहे. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील तीन वर्षात मुंबईचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही करु. काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यावेळी विकासाच्या या डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये बदलू, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

हे वाचा >> Photo: राज ठाकरेंना नडणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप; काय आहे वाद?

डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा झपाट्याने विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या भाषणात डबल इंजिनचा वारंवार उल्लेख केला. ते म्हणाले, “राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळे मागच्या सहा महिन्यात महाराष्ट्रात गतीमान पद्धतीने निर्णय झाले आणि त्याची अमलबजावणी झाली. मधल्या काळात महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार नसल्यामुळे लोकांच्या कामांची अडवणूक झाली. मुंबईतील मनपाकडे खूप पैसा आहे, पण त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा. फक्त बँकामध्ये पैसा पडून काय उपयोग? त्याचा वापर जनतेसाठी व्हायला हवा.”

हे वाचलंत का >> ईडी चौकशी होत असलेल्या आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे शिंदेकडून कौतुक; म्हणाले, “त्यांनी मुंबईला…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचे अनेक कयास बांधले जात आहेत.

ते तिसरं इंजिन मनसेचं असणार का?

राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार आल्यापासून सत्ताधारी पक्षाची मनेसेशी जवळीक लपून राहिलेली नाही. शपथविधी झाल्यापासून मागच्या सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. दोन्ही नेत्यांचे राज ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी उघडपणे हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष आव्हान दिलेले आहे.

हे वाचा >> ‘बाळासाहेबांची शिवसेना’ झाली, आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’

मनसे पक्षाचा जन्मच मराठी माणसाच्या विकासाचा कैवार घेऊन झालेला आहे. मराठी माणसांचे हक्क, प्रश्न यासाठी मनसेने वारंवार आंदोलने केलीत. मुंबईमध्ये मराठी टक्का मोठा आहे. शिवसेनेकडील हा मराठी टक्का आपल्याबाजूला वळण्यासाठी मनसेची मदत होऊ शकते. कदाचित त्यामुळे डबल इंजिन सरकारला ट्रिपल इंजिनची गरज लागू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या वक्तव्यानंतर यावर राजकीय चर्चा नक्कीच होईल. त्यातूनच पुढे ट्रिपल इंजिन कोणते, हे समोर येऊ शकते.