मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान होतील आणि काँग्रेस व इंडिया आघाडीचे पानिपत होईल, हेच चार राज्यांच्या निवडणूक निकालांनी अधोरेखित केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे म्हणाले, मोदी यांची लोकप्रियता, करिष्मा व देशाभिमान, गृहमंत्री अमित शहा यांचे नियोजन यामुळे एनडीएला  यश मिळाले. हर घर मोदी, असे आधी म्हटले जात होते, आता प्रत्येक मनात मोदी (हर मन मोदी) असे चित्र आहे. मोदी यांच्या बदनामीचे षडयंत्र आखले गेले, विरोधकांकडून अनेक आरोप झाले. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली व परदेशात जाऊन भारत तोडो, असे आरोप केले. पण जनता ही देशावर प्रेम करते व तिला सर्व काही समजते. मोदी यांनी देशाचा लौकिक जगभरात वाढविला आहे. त्यामुळे जनतेने मोदींनाच भरभरून कौल दिला आहे आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असफल ठरली आहे.

हेही वाचा >>> हिंदी’ पट्टय़ात भाजप भक्कम, काँग्रेसला दक्षिणेचा हात

आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज दहा दिवसात माफ करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत दिले होते. पण पाच वर्षांत काहीच केले नाही. कर्नाटकमध्येही निवडणुकीत अनेक आश्वासने दिली. पण नंतर राज्य सरकारकडे ती पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याची कारणे देण्यात येत आहेत. पण पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वसामान्यांची काळजी घेत असून जनतेला सर्व समजते. त्यामुळे जनता मोदींच्या पाठीशी असून त्यांचे कर्तृत्व शिखरावर असल्याचे सिद्ध झाले आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde reaction that the result underlines that modi will become the prime minister again amy