मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहातील बंद दालनात १५ मिनिटे चर्चा झाली. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राणे यांची जनआशीर्वाद यात्रा, त्यांचे बेलगाम आरोप यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले. राणे यांना आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त केली. पण फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांची वक्तव्ये व आरोपांकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. शिवसेना नेते शांत राहिल्यास परिस्थिती निवळेल, त्यांना आवर घालावा, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात चर्चा
राणे यांना आवर घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 28-08-2021 at 00:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackeray leader of opposition devendra fadnavis obc reservation question discussion akp