मुंबई : उत्तर प्रदेशात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील नामांकित ज्येष्ठ उद्योगपती आणि उद्योगसमूहांशी योगी आदित्यनाथ हे गुरुवारी दिवसभर भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. परदेशात उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणण्याबाबत यशस्वी रोड शो केल्यानंतर योगी आता विविध राज्यांना भेटी देत आहेत. मुंबईत त्यांचा गुरुवारी रोड शो होत आहे. देशातील नऊ शहरांमध्ये त्यांचे रोड शो होणार असून त्यात राज्यातील गुंतवणूक संधीबाबत ते चर्चा करणार आहेत.उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी आदित्यनाथ हे आपल्या मुंबई दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, मिहद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बाँबे डाईंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. योगी आदित्यनाथ हे बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या उत्तर प्रदेशातील मान्यवरांशी चर्चा ते करणार आहेत. उत्तर प्रदेशात चित्रनगरी (फिल्मसिटी) उभारण्यात येत असून त्यादृष्टीने बॉलीवूडमधील ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आदींशीही चर्चा करणार आहेत.

दिवसभरात १७ बैठका
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच गुरुवारी दिवसभरात उद्योजक तसेच मान्यवरांच्या १७ विविध बैठका त्यांनी आयोजित केल्या आहेत. या बैठकांमध्ये उद्योजकांशी संवाद साधणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister yogi adityanath arrived in mumbai to boost industrial investment in uttar pradesh amy
Show comments