दहा लाखांच्या खंडणीसाठी आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसानी अवघ्या आठ तासांत जेरबंद केल्याची घटना शनिवारी तुर्भे येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे अपहरण करणारा मुख्य सूत्रधार नातेवाईकच असल्याचे समोर आले आहे.
तुर्भे सेक्टर २१ येथे राहणाऱ्या महम्मद शेख यांच्याकडे त्यांचा नातेवाईक मोहम्मद राजा राईन कामाला होता. काही महिन्यांपूर्वी या राईनला नवी मुंबई पोलिसांनी टायर चोरीच्या एका प्रकरणात अटक केली होती. पोलिसांना ही माहिती शेख यांनीच दिल्याचा संशय राईनच्या मनात होता. या रागातून त्याने शुक्रवारी संध्याकाळी शेख यांचा आठ वर्षांचा मुलगा रियाज याचे अपहरण केले. त्यानंतर दहा लाखांची खंडणी मागितली. मात्र अपहरकर्त्यांच्या धमकीला न घाबरता शेख यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली. गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह एका रात्रीत पनवेल व वडाळा येथून राईनसह त्याचा साथीदार अमित खान या दोघांना अटक केली.

Story img Loader