मुंबई : बालदिनाचे औचित्य साधून कांदळवन प्रतिष्ठानाने वसई पक्षी संघाच्या सहकार्याने विरार येथील मामाचीवाडी समुद्रकिनारी ‘बर्ड वाॅक’चे आयोजन केले होते. यावेळी ५ ते १२ वयोगटातील १५ मुलांना वेगवेगळ्या पक्ष्यांची, त्यांच्या हालचाली, खाद्यांची माहिती देण्यात आली.
यावेळी मुलांना वेगवेगळ्या प्रजातींची ३० पक्षी दिसले.
तसेच, मुलांना पक्ष्यांबाबत अधिक माहिती मिळावी, यासाठी कांदळवन प्रतिष्ठानकडून माहिती पुस्तिका देण्यात आली. लहान मुलांना निसर्गाबाबत, पक्ष्यांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आगळावेगळा बालदिन साजरा करण्यात आला. पक्षी सप्ताह आणि बाल दिवस या दोन्ही बाबींचा मेळ घालून नुकताच ‘बर्ड वाॅक’ उपक्रम संपन्न झाला, अशी माहिती कांदळवन प्रतिष्ठानकडून देण्यात आली.