मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. या तुंबलेल्या मुंबईवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी कविता करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. यावर चित्रा वाघ यांनी “पावसाच्या सरी येताच मुंबई भरली आहे, ‘ही’ कुणाची जबाबदारी? असा प्रश्न उपस्थित केला आहे.”

मुंबई तुंबली असतांना मुख्यमंत्री त्यांच्या घरी बसले आहेत. त्यांना जनता विचारत आहे ही जबाबदारी कुणाची, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

“आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?”; दरेकरांचा अनिल परब यांना सवाल!

पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी, चुनाभट्टी ते सायन आणि कुर्ला परिसरात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे वाहतूक १०:२० वाजेपासून, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक ११:१० वाजेपासून थांबवण्यात आली होती. ठाणे ते कर्जत/कसारा आणि मानखुर्द ते पनवेल लोकल वाहतूक सुरू आहे. ट्रान्स हार्बर आणि बीएसयू (उरण) रेल्वे मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होता.

Story img Loader