शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक प्रकरण असो किंवा महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भातील प्रकरणं असो भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या सातत्याने महिलांविरोधातील अत्याचारांवर आवाज उठवता दिसतात. नुकताच त्यांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवरच निशाणा साधलाय.

मुंबईमधील लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यावरुन चित्रा वाघ यांनी आता थेट केंद्रात सत्तेत असणाऱ्या त्यांच्याच पक्षाच्या सरकारला जाब विचारलाय. रेल्वे मंत्रालयाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना टॅग करुन केलेल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केलीय.

veteran actor amol palekar remark in jaipur literature festival 2025
जयपूर साहित्य महोत्सव :सध्या सरकारविरोधात जो बोलतो तो देशद्रोही; अमोल पालेकर यांचे परखड मत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Image Of Manoj Jarange And Prakash Ambedkar
Manoj Jarange : “आमच्यात वर्चस्वाची लढाई वगैरे…”, प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला जरांगे पाटलांचे थेट उत्तर
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”

मुंबईत रात्रीच्यावेळी लोकलनं प्रवास करताना महिला डब्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असणं बंधनकारक आहे. पण रात्री १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला डब्यात पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित नसल्याची तक्रार करणारा एक व्हिडिओ महिला प्रवाशानं पोस्ट करत यासंदर्भात सोशल मीडियावरुन महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

नक्की वाचा >> “मुख्यमंत्री, या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका”; शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप करत चित्रा वाघ यांची मागणी

याच व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी केंद्रीय मंत्र्यांना टॅग केलंय. “महिला मुलींवरचे वाढते हल्ले पहाता त्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा उपयोग काय? मध्य रेल्वे का नाहीयेत पोलिस महिला डब्यात उत्तर द्या. कित्येक वेळा महिला मुलींवर हल्ले झालेत बऱ्याच जणींना जीव गमवावे लागलेत. रावसाहेब दानवे याची चौकशी व्हावी,” असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटखाली अनेकांनी चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. तसेच अनेकांनी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मध्य रेल्वेने अधिक सतर्क राहण्याची आणि जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलंय.

Story img Loader