मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला राजर्षी शाहू महाराज यांचं नाव द्यावं, अशी मागणी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेने केली आहे. शाहू महाराज यांचं स्मृती शताब्दी वर्ष आहे. त्यांचे कार्य तसेच त्यांचे विचार यांची दखल घेऊन वसतीगृहाला शाहू महाराज यांचं नाव द्याव, असे मत छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आहे. तर याआधी या वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावकर यांचं नाव द्याव, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यामुळे वसतीगृहाच्या नामकरणावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> शिंदे आणि उद्धव ठाकरेंना धक्का! विधिमंडळ सचिवांकडून आदित्य ठाकरे वगळता सर्व ५३ आमदारांना नोटीस
छात्रभारती विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला शाहू महाराज यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली आहे. तसं वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या वृत्तानुसार “गेली अनेक वर्षी आंतराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृह सुरु नव्हतं. छात्रभारती तसेच समविचारी संघटनांनी मागणी केल्यानंतर हे वसतीगृह सुरु करण्यात आलंय. वसतीगृह ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचे काम शाहू महाराजांनी केलेले आहे. सर्व जाती-जामातीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहं सुरु केली. जे विद्यार्थी परदेशी जाणार होते, त्यांना शिष्यवृत्ती दिली. हे वर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. शाहू महाराजांचे निधन मुंबईतच झाले आहे. त्यामुळे आम्ही कुलगुरुंना पत्र लिहून या वसतीगृहाला शाहू महाराजांचं नाव द्यावं, अशी मागणी केली आहे,” अशी माहिती छात्रभारतीचे पदाधिकारी रोहित ढाले यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> “बंडखोरीसाठी ५० कोटी घेतले”; राऊतांच्या आरोपाला अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…
“राज्यपालांनी जी सूचना केली आहे, त्याचे स्वागत आहे. ते कुलपती आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. मात्र विद्यार्थी म्हणून शाहू महाराजांचे नाव वसतीगृहाला दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आमचा नावाला विरोध नाही. छत्रपतींच्या नावाचा विचार केला पाहिजे, असे अमचे मत आहे. राज्यपाल कोणता अजेंडा राबवत आहेत, ते त्यांच्या कृतीतून सांगत आहेत. पण आमचं असं मत आहे, की शाहू महाराज यांचं शैक्षणिक कार्य पाहता त्या वसतीगृहाला शाहू महाराज याचंच नाव भेटले पाहीजे,” असे ढाले यांनी सांगितले.
हेही वाचा >>> शिवसेना खासदार संजय जाधव शिंदे गटात सामील होणार? मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण
दरम्यान, आठ जुलै रोजी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठातील चार इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं होतं. यातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाला स्वातंत्र्यवीर सावकर यांच नाव द्यावं, अशी सूचना कोश्यारी यांनी कुलगुरुंना केली होती. मात्र विद्यार्थी संघटनेने या वसतीगृहाला शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केल्यामुळे नेमकं नाव कोणाचं द्यावं यावर वाद पेटण्याची शक्यता आहे.