प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्यविरोधात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. गणेश आचार्य यांच्यावर अश्लील व्हिडीओ बघण्यासाठी बळजबरी करणे, लैंगिक छळ, पाठलाग आणि गुप्तहेर प्रमाणे काम केल्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गणेश आचार्य यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला सहाय्यक नृत्य दिग्दर्शकाने हे आरोप केले आहेत.
एका सहाय्यक नृत्य दिग्दर्शकाने २०२० मध्ये गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी करणारे ओशिवराचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. गणेश आचार्य यांच्यासह त्यांच्या असिस्ंटविरोधात आयपीसी कलम ३५४ – अ (लैंगिक छळ), कलम ३५४-सी, कलम ३५४-डी (पाठलाग), ५०९ (कोणत्याही महिलेचा अपमान करणे), कलम ३२३ (दुखापत करणे), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतुपुरस्सर अपमान), कलम ५०६ (धमकी देणे) आणि कलम ३४ (गुन्हा करण्याचा हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“त्यांना काश्मीरमधील घरी जायचे होते…”, वडिलांसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट करत अनुपम खेर भावूक
याप्रकरणी सहाय्यक नृत्यदिग्दर्शकाशी चर्चा केली असता त्यांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तर दुसरीकडे गणेश आचार्य यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, यापूर्वीच गणेश आचार्य यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यांनी आपल्या सहाय्यक नृत्यदिग्दर्शकाचे हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच जेव्हा त्या महिला सहाय्यक नृत्यदिग्दर्शकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, तेव्हा त्यांच्या कायदेशीर टीमने तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाईल, अशी माहिती दिली होती.
नेमकं प्रकरण काय ?
गणेश आचार्य यांच्यासोबत लैंगिक संबंध नाकारल्यानंतर त्यांनी माझा छळ केला. माझ्यावर अश्लील कमेंट करणे, अश्लील चित्रपट दाखवणे आणि विनयभंगही केला, असा आरोप त्या नृत्य दिग्दर्शकाने केला. या महिलेने केलेल्या आरोपानुसार, जर तिला यशस्वी व्हायचे असेल तर तुला माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवावे लागतील. तिने यासाठी नकार दिला आणि त्यानंतर सहा महिन्यांनी इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने माझे सदस्यत्व रद्द केले.
तीन महिने उलटूनही प्रियंका चोप्राच्या आईने अद्याप पाहिला नाही नातीचा चेहरा, म्हणाल्या “सध्या ती…”
त्यानंतर २०१९ मध्ये एका बैठकीत मी गणेश आचार्यांनी केलेल्या या कारवाईला विरोध केला तेवहा मला शिवीगाळ करण्यात आली. तसेच मला मारहाणही करण्यात आली. त्यांच्या एका महिला असिस्टंने मला बेदम मारहाण केली, शिवीगाळ केली. त्यानंतर मी पोलिसात गेले. त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि केवळ एक अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला, असेही तिने सांगितले.
गणेश आचार्य हे बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शकांपैकी एक आघाडीचं नाव आहे. गणेश आचार्य यांनी अनेक गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं असून, त्यांना टॉयलेट : एक प्रेम कथा सिनेमातील गोरी तू लाथ मार गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.