राज्यातील सर्व मद्यविक्री परवाने असलेल्या हॉटेल्समध्ये मद्य प्राशन करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत तर मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना मध्यरात्री एक वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले. ही परवानगी मंगळवार २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दोन दिवसांसाठीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
२५ आणि ३१ डिसेंबर रोजी मोठय़ा प्रमाणात मद्यविक्री होत असते, असे सांगून डॉ. मुखर्जी म्हणाले की, मद्यविक्रीची दुकाने इतरदिवशी १०.३० वाजेपर्यंत सुरू असतात तर बार आणि पबना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असते. २५ आणि ३१ डिसेंबर रोजी ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.     

Story img Loader