सिगारेट वा बिडी विक्रेत्यांना खुल्या स्वरुपात विकता येणार नाही. सिगारेट किंवा बिडी फक्त पाकिट स्वरुपातच विकणे बंधनकारक असेल. अन्यथा वैध मापन कायद्यातील तरतुदीनुसार अशा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
वैधमापन विभागाचे महानिरीक्षक व संचालक अमिताभ गुप्ता यांनी उत्पादक कंपन्यांना नोटिसा पाठवून सुधारीत वैधमापन कायद्याची अमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. या कायद्यानुसार किरकोळ विक्री किंमत म्हणजेच कमाल किंमत ही पाकिटबंद उत्पादनाला लागू असते. अशा पाकिटबंद उप्तादनातील खुल्या वस्तू विकता येत नाही, असे वैधमापन कायद्यातील कलम १८ सांगते. सिगारेट वा बिडीच्या पाकिटांवर आरोग्यासाठी घातक असे लिहिलेले असते. परंतु या पाकिटातील सिगारेट वा बिडी विकली जाते तेव्हा त्यावर तो उल्लेख नसतो. त्यामुळे खुल्या स्वरुपात सिगारेट वा बिडी विकणे हा वैधमापन कायद्यानुसार गुन्हा होतो.